मुंबई: आतापर्यंत पाणी, वीज किंवा तत्सम वस्तू जपून वापरा असं आव्हान केलं जायचं. मात्र, आता नोटा जपून वापरा म्हणण्याची वेळी आली आहे. कारण, उद्यापासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत.


दुसरा शनिवार, रविवार आणि ईद या सुट्ट्या सलग आल्यामुळं बँकांचं शटर तीन दिवस डाऊन असणार आहे. त्यामुळं रक्कम काढण्यासाठी आज बँका आणि एटीएम बाहेर मोठ्या रांगा पाहायाला मिळत आहेत.

नोटबंदीच्या घोषणेला महिना उलटला तरी सुट्ट्या पैशांची चणचण कायम आहे. त्यामुळं पुढचे तीन दिवस बँका बंद असल्यामुळं खिशातली कॅश जपून वापरावी लागणार आहे.