वाराणसी : निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच्या बातम्या या चुकीच्या असून त्यात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या वतीनं करण्यात आला आहे. निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा दिल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर रिलायन्सने खुलासा केला आहे.
काही माध्यमांमधून असं सांगण्यात येत होतं की निता अंबानी यांना बनारस हिंदू विद्यापीठाने व्हिजिटिंग प्रोफेसरचा दर्जा देण्यासाठी एक प्रपोजल मांडलं होतं. परंतु या सर्व बातम्या या चुकीच्या आहेत आणि त्यात कोणतेही तथ्य नाही असं रिलायन्स इंडस्ट्रिजने सांगितलं आहे.
आयुष्यात खरा आनंद परत मिळाला, ISL च्या यशस्वी आयोजनाने नीता अंबानी खुश
रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा असलेल्या निता अंबानी यांनी या महिला दिनाच्या निमित्ताने खास महिलांच्यासाठी असलेल्या हरसर्किल या डिझिटल प्लॅटफॉर्मचे लॉन्च केलं होतं. यामध्ये महिलांचे सशक्तीकरण आणि जागतिक स्तरावर त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केलं जाणार आहे. सहभाग, नेटवर्किंग आणि परस्पर समर्थनासाठी 'हरसर्किल' प्लॅटफॉर्म महिलांना एक सुरक्षित माध्यम ठरेल.
महिलांसाठी जगभरातील डिजिटल गट म्हणून 'हरसर्कल' तयार करण्यात आलं आहे. भारतीय महिलांपासूनच याची सुरुवात होणार आहे. दरम्यान, जगभरातील महिलांच्या भागीदारीचा रस्ता यामुळे खुला होणार आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असल्यामुळे हे प्रत्येक वयोगटातील आणि आर्थिक सामाजिक पार्श्वभूमी असणाऱ्या महिलांच्या वाढत्या गरजा आणि त्यांच्या आकांक्षा, महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांना पूर्ण करेल.