नवी दिल्ली : जगातल्या सर्वाधिक 30 प्रदूषित शहरांमध्ये एकट्या भारतातील 22 शहरांचा समावेश आहे असं स्वीसच्या IQAir या संस्थेने आपल्या एअर क्वॉलिटी अहवालात सांगितलं आहे. जगातील प्रदूषित देशांच्या यादीत भारताचा तिसरा क्रमांक लागतोय तर दिल्ली ही सर्वात जास्त प्रदूषित राजधानी असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय.


जगभरातल्या 40 प्रदूषित शहरांच्या यादीत 37 शहरे केवळ दक्षिण आशियातील आहेत. त्यामुळेच दक्षिण आशियातील 13 ते 22 टक्के लोकांचा प्रदूषणामुळे मृत्यू होतोय. दक्षिण आशियातील या प्रदूषणाचा परिणाम केवळ लोकांच्या आरोग्यावरच होत नसून संबंधित देशांच्या एकूण जीडीपीच्या 7.4 टक्के जीडीपीचे नुकसान प्रदूषणामुळे होतंय. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश या देशातील वायू प्रदूषणाचा दर्जा अत्यंत कमी गुणवत्तेचा असल्याचंही या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 


Sonam Wangchuk | सैनिकांसाठी 'रँचो'चा नवा अविष्कार, बोचऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी सोनम वांगचुक यांनी बनवला खास तंबू   


विशेष म्हणजे जगातल्या 30 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये 11 शहरं ही एकट्या उत्तर प्रदेश राज्यातील आहेत. त्यामुळे भारतातील प्रदूषण हे अत्यंत 


भारतात 2019 सालच्या तुलनेत 2020 साली प्रदूषणात घट झाल्याचं पहायला मिळालंय. जगभराचा विचार केला तर जवळपास 70 लाख लोकांचा मृत्यू हा केवळ वायू प्रदूषणामुळे होतोय.यामध्ये सहा लाखांहून जास्त मृत्यू हे बालकांचे आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन लागलेला होता. त्यामुळे देशातील अनेक शहरात तुलनेने कमी प्रदूषण झाल्याचं दिसून आलं होतं. स्वीसच्या IQAir या संस्थेच्या एअर क्वॉलिटी अहवालात जगातल्या 106 देशांच्या प्रदूषणाचा अभ्यास करण्यात आला आहे. 


भारताचा विचार करता दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण पहायला मिळतंय. या शहरातील प्रदूषणाच्या समस्येमध्ये गेल्या काही वर्षामध्ये वाढ झाली असून त्यामुळे सर्व शाळा आणि महाविद्यालयंही काही काळापूरती बंद करावी लागतात. उद्योगधंद्यानी प्रदूषणाच्या नियमांचे पालन न करणे आणि शेजारील पंजाब, हरियाणा या राज्यात शेतीतील पराली म्हणजेच उत्पादन काढल्यानंतर उरलेला पालापाचोळा जाळला जातोय. त्यामुळे दिल्लीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय. 


 


Dighi Port: दिघी बंदरात अदानी उद्योग समुहाची 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक, बंदराचे अधिग्रहण पूर्ण