Kargil Diwali Celebration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सीमेवर जवानांसोबत (Armed Forces) दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांच्या सुरात सूर मिसळत 'वंदे मातरम्' हे गाणं गायलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी कारगिलमध्ये लष्कराच्या जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी जवानांसोबत देशभक्तीपर गाणं गात जवानांचा उत्साह वाढवला. याचा व्हिडीओ पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.


कारगिलमधील उत्साही दिवाळीची झलक


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'कारगिलमधील उत्साही दिवाळीची एक झलक'. या व्हिडीओमध्ये कारगिलमध्ये जवान माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत. यावेळी पंतप्रधानही जवानांच्या सुरात सूर मिसळत माँ तुझे सलाम गाणं गाताना दिसत आहेत.






सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम


भारताच्या सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सैनिकांचं कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सैनिक हे देशाचं 'संरक्षण कवच' आहेत, ज्यामुळे आपण सर्व भारतीय सुरक्षित राहू शकतो. कारगिल सीमेवर सैनिकांसोबत (Indian Army) दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्याची आपली वार्षिक परंपरा कायम ठेवत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) सोमवारी कारगिलला पोहोचले. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी जम्मूच्या नौशेरा येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 


पंतप्रधान मोदी यांनी कारगिल येथे संबोधित केलं. सैनिकांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, सैनिक हे माझं कुटुंब आहेत. त्यांच्यापेक्षा दिवाळी साजरी करण्यासारखा आनंद इतर कशातही नाही. पंतप्रधानांनी म्हटलं की, 'तुम्ही सर्वजण गेली अनेक वर्षे माझे कुटुंब आहात. कारगिलमधील आमच्या शूर जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळणे यासाठी मी भाग्यवान आहे.