मुंबई : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आपलं पहिलं आर्थिक पतधोरण जाहीर केलं. आरबीआयने रेपो दरात कपात केली आहे. रेपो दर 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 6 टक्क्यावरुन 5. 75 इतका करण्यात आला आहे.


रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे व्याजदरात कपात होऊन, गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे.

उर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिलंच पतधोरण सादर केलं.

रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर.  रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं.म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्रहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात.  तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.

रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?


रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.

संबंधित बातम्या

रेपो रेट म्हणजे काय?

एसबीआयसह चार बँकांचं कर्ज स्वस्त, ईएमआय घटणार 

रेपो रेटमध्ये पाव टक्क्याची कपात, गृहकर्जदारांना रिझर्व्ह बँकेकडून दिलासा!