नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नव्या संसद भवन इमारतीचं भूमीपूजन झालं. भूमीपूजनानंतर सर्व धर्मांच्या धर्मगुरुंकडून प्रार्थना करण्यात आली. शास्त्री भवनजवळ रिकाम्या जागेवर नवीन संसदेची इमारत उभारण्यात येणार आहे. सुमारे 64500 चौरस मीटर जागेवर ही इमारत तयार होणार असून यासाठी सुमारे 971 कोटी रुपये खर्च येणार आहे. जुने संसद भवन अद्याप शंभर वर्षे पूर्ण झाले नसले तरी त्याआधी नवीन संसद भवन भारतात तयार होत आहे.


नव्या संसद भवनच्या सभागृहात लोकसभेच्या सदस्यांसाठी 888 सीट असतील. याशिवाय राज्यसभा सदस्यांसाठी 326 हून अधिक सीट असणार आहेत. येथे 1224 सदस्यांची बसण्याची व्यवस्था देखील असेल. याशिवाय प्रत्येक सदस्यासाठी 400 स्क्वेअर फूटचे कार्यालयही या नवीन इमारतीत असेल. जुन्या संसदेपेक्षा नवीन संसद सुमारे 17 हजार चौरस मीटर मोठे आहे. हे संसद भवन 2022 पर्यंत तयार होईल. नवीन संसद भवनात सर्व खासदारांसाठी कार्यालय तयार केले जाणार आहे, ते 2024 पर्यंत तयार होईल. तथापि, जगात अनेक संसदेच्या इमारती भारतापेक्षा जुन्या आहेत.


जगातील संसद भवनच्या सर्वात जुन्या इमारती..




  • सन 1927 मध्ये भारताच्या विद्यमान संसद भवनचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ही इमारत बांधण्यासाठी केवळ 83 लाख रुपये खर्च झाले.

  • सध्याच्या भारतीय संसदेच्या सभागृहाला 100 वर्षेही पूर्ण झाली नाहीत. जगात असे अनेक देश अस्तित्वात आहेत, जिथे शेकडो वर्षांपूर्वी बांधलेले संसद भवन अजूनही देशातील खासदारांचे केंद्र आहे. जगातील सर्वात जुनी संसद इमारत (द बिन्नेनहॉफ) नेदरलँड्सची आहे. ते 13 व्या शतकात बांधले गेले. येथे आजही खासदारांच्या बैठका होतात.

  • याशिवाय इटलीचे संसद भवन (पालाझो मॅडमा) देखील खूप जुने आहे. येथे संसदेची स्थापना 1505 मध्ये झाली.
    फ्रान्सचे संसद भवन (लक्समबर्ग पॅलेस) देखील जुने आहे. ही इमारत तेथील राजा निवास म्हणून 1615 ते 1645 दरम्यान बांधली गेली. 1958 पासून येथे संसद भवनाची बैठक घेण्यात येत आहे.

  • याशिवाय अमेरिकेचे संसद भवनही 200 वर्षांहून अधिक जुने आहे. अमेरिकेची संसद सन 1800 मध्ये बांधली गेली.
    त्याचबरोबर ब्रिटनचे संसद भवनही खूप जुने आहे. येथील हाऊस ऑफ कॉमन 1840 मध्ये बांधले गेले होते आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स 1870 मध्ये बांधले गेले होते.


संबंधित बातमी :  

New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन; टाटा समूहाकडे निर्मितीचं

New Sansad Bhavan Foundation | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नव्या संसद इमारतीचं भूमिपूजन

काम