कर्नल पुरोहितांना काँग्रेसनं अडकवलं?
एबीपी माझा वेब टीम | 20 Apr 2018 11:56 PM (IST)
हैदराबाद मक्का मशिद बॉम्बस्फोटातील भगव्या दहशतवादाच्या मुद्यावरून तोंडघशी पडलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : हैदराबाद मक्का मशिद बॉम्बस्फोटातील भगव्या दहशतवादाच्या मुद्यावरून तोंडघशी पडलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीच्या दाव्यानुसार, यूपीए सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांना कर्नल पुरोहित यांना गोवण्यात येत असल्याची पूर्ण कल्पना होती. इतकंच नव्हे, तर कर्नल पुरोहित आपल्या प्रत्येक कामासंदर्भातील सूचना आपल्या वरिष्ठांना देत होते. लष्करी गुप्तवार्ता महासंचालनालयाकडील काही महत्वाची कागदपत्र मिळाल्याचा दावा या वाहिनीनं केला आहे. कर्नल पुरोहित एका गुप्त मोहिमेवर होते आणि याची कल्पना संरक्षण विभागाला होती असाही दावा केला आहे. २००८ साली जेव्हा कर्नल पुरोहितांना ताब्यात घेण्यात आलं तेव्हाही ते आपल्या मोहिमेवर होते. असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं असल्याचं या वाहिनीनं म्हटलं आहे. यासंदर्भात तत्कालीन दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख राकेश मारिया आणि संरक्षण खात्यात पत्र व्यवहारही झाला होता.