New Governor : महाराष्ट्र, बिहारसह 13 राज्यात नवीन राज्यपाल नियुक्त करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील वादग्रस्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्विकारला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस  राज्यपाल म्हणून पदभार स्विकारणार आहेत. याआधी ते झारखंडचे राज्यपाल होते. याच वर्षी सुप्रीम कोर्टातून निवृत्त होणारे न्यायाधीश अब्दुल नझीर यांना आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अब्दुल नझीर यांनी राम मंदिर, ट्रिपल तलाक यासारखे प्रकरणावर निर्णय दिलेला आहे. आज 13 राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी 9 राज्यात निवडणुका होणार आहेत. 


'या' नऊ राज्यात होणार निवडणुका 


यंदा नऊ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पूर्वोत्तरमधील चार राज्यांचा समावेश आहे. त्रिपुरा, मेघालय, नागालँड आणि मिझोराम येथे निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. तर  मध्य प्रदेश, राज्यस्थान आणि छत्तीसगड येथे पुढील काही दिवसांत निवडणुकांची घोषणा होणार आहे. तर दक्षिणेकडील कर्नाटक आणि तेलंगाणामध्येही यंदा निवडणुका होणार आहे.  केंद्रशासित प्रदेश (UT) झालेल्या लदाखमध्ये उपराज्यपाल (LG)नियुक्त करण्यात आलेले आहेत.  


कोणत्या 13 राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे?


1. लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल म्हणून  नियुक्ती


2. सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची नियुक्ती


3. झारखंडचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन यांची नियुक्ती


4.  हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती


5. आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया यांची नियुक्ती


6. आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची नियुक्ती


7.  आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती


8.  छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून नियुक्ती


9. मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती


10.  बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती


11. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


12. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


13.  अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


आणखी वाचा :
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर, रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल