नवी दिल्ली: तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता विमान प्रवास रेल्वेच्या प्रवासापेक्षाही स्वस्त होणार आहे. कारण तासाभराच्या विमानप्रवासाठी यापुढे कुठल्याही एअरलाईन्स कंपनीला 2500 रुपयांपेक्षा अधिक भाडं आकारता येणार नाही. केंद्र सरकारच्या नव्या विमान वाहतूक धोरणांमध्ये यासंदर्भात तरतूद करण्यात आली होती आणि या धोरणाला मोदी सरकारनं मंजूरी दिली आहे. त्यामुळे विमानप्रवास करणाऱ्यांना 'अच्छे दिन' आल्याचं चित्र आहे.


 

- पुणे ते शिर्डी हा प्रवास अवघ्या अडीच हजारात करता येणार आहे.

 

- एक तासाचा अवधी असणाऱ्या विमान प्रवासासाठी आता 2500 रु. मोजावे लागणार

 

- अर्ध्या तासाचा अवधी असणाऱ्या विमान प्रवासासाठी आता 1250 रु. मोजावे लागणार

 

- ही नवी योजना जुलैच्या एक तारखेपासून लागू होणार आहे.

 

देशात 482 विमानतळं आहेत. पण यातील केवळ 77 विमानतळांवरुनच विमानं उड्डाणं घेतात. इतर विमानतळांची अवस्था फारच बिकट आहे. त्यामुळेच याचा विचा करुन ही नवी योजना सुरु करण्यात आली आहे.

 

पूर्वीच्या धोरणात प्रवाशांना जाच आणणारे अनेक नियम होते, ज्यामुळे विमान प्रवास अडचणीचा होता. सरकारने ऑक्टोबर 2015 मध्ये नवीन धोरणाचा मसुदा तयार केला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने विमानाचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.