नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवार) सकाळी 10 वाजता होणार आहे. यामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे. तर तीन विद्यमान मंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती मिळण्याचीही शक्यता आहे.
निर्मला सीतारामन यांना कॅबिनेटपदी बढती मिळणार असल्याचं समजतं आहे. तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांचीही मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची माहिती समजते आहे.
गुजरात, कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन त्या राज्यांमधील नेत्यांचा मंत्रिमंडळातला प्रभाव कायम राहील याची काळजी घेतली आहे. मात्र या सगळ्या घडामोडींमध्ये एनडीएच्या कुठल्याही मित्रपक्षाला मोदींनी फेरबदलात स्थान दिलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि जेडीयूचा मोठा अपेक्षाभंग झाला आहे.
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर कुणाची खुर्ची जाणार, कुणाला बढती मिळणार तर कुणाला डच्चू मिळणार याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. याबाबतचं चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे.
थोड्याच वेळापूर्वी पंतप्रधानांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.
या 9 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता :
1. अश्विनीकुमार चौबे : पहिल्यांदाच खासदार, भागलपूर येथून आमदार आणि बिहारचे आरोग्यमंत्री होते.
2. वीरेंद्र कुमार- लोकसभा खासदार, जे.पी. मूव्हमेंटशी निगडीत, टिकमगढ, मध्यप्रदेशमधून ६ वेळा खासदार
3. अनंत कुमार हेगडे- कर्नाटक लोकसभा खासदार
4. राजकुमार सिंग (आर. के. सिंग)- आरा बिहार खासदार, माजी गृहसचिव
5. शिवप्रताप शुक्ला- राज्यमंत्री होण्याची शक्यता, गोरखपूर, उत्तर प्रदेश
6. हरदीप सिंग पुरी- माजी आयएफएस अधिकारी, अलिकडेच भाजपत प्रवेश
7. सत्यपाल सिंग- मुंबई पोलिस माजी आयुक्त, बागपत येथून पहिल्यांदाच खासदार
8. के अल्फोंस- केरळ, माजी आयएएस अधिकारी
9. गजेंद्रसिंग शेखावत- जोधपूर, राजस्थान
संबंधित बातम्या :
मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र
संरक्षणमंत्रिपदासाठी गडकरी, प्रभू आणि सुषमा स्वराज यांची नावं चर्चेत
मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांना संधी : सूत्र
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Sep 2017 10:01 PM (IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवार) सकाळी 10 वाजता होणार आहे. यामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याची माहिती सुत्रांकडून समजते आहे
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -