नवी दिल्ली : येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरु होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 16 पासपोर्ट केंद्रं लवकरच सुरु करण्यात येणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी ही दिली आहे.


देशातील नागरिकांना पासपोर्ट सेवा सहज आणि सुलभपणे मिळावी या उद्देशाने ही नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. येत्या मार्च 2018 पर्यंत देशात 251 केंद्र सुरू होणार आहेत. यापैकी महाराष्ट्रात 20 पासपोर्ट केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हिडिओ : पासपोर्टसाठी अर्ज करण्याच्या सोप्या टिप्स

महाराष्ट्रातील 20 पासपोर्ट केंद्रांपैकी 4 पासपोर्ट केंद्र सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरु करण्यात आली आहेत. उरलेली 16 पासपोर्ट केंद्र लवकरच सुरु होतील अशी माहिती ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

नवीन 16 पासपोर्ट केंद्रं कुठे?

महाराष्ट्रात नवीन 16 पासपोर्ट कार्यालये सुरु करण्यात येणार आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा, जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव याठिकाणी नवीन केंद्र सुरु होतील. या 16 नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची संख्या 27 होणार आहे.