आरबीआयने ‘नोट परतीची नियमावली 2009’ जारी करुन, सामान्य जनतेला आपल्या फाटक्या नोटा बदलण्याचा पर्याय दिला आहे.
नव्या नियमानुसार फाटक्या नोटा जसे की नोटाचा काही भाग फाटला असेल, दोन तुकडे जोडले असतील, तर त्या बदलता येतील.
फाटक्या नोटांच्या बदल्यात किती पैसे परत मिळतील?
- भारतीय रिझर्व्ह बँक नियमावली, 2009 नुसार जर तुमच्याकडे फाटलेल्या 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नोटा असतील, आणि त्या 50 टक्क्यांपेक्षा कमी फाटल्या असतील, तर बँक तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे परत देईल.
- जर 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नोट 50 टक्क्यांपेक्षा जास्त फाटली असेल, तर बँका तुम्हाला त्याचे काहीही पैसे देणार नाहीत.
- याचप्रमाणे 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा कमी फाटली असेल, तर पूर्ण पैसे मिळतील.
- तर 50 किंवा त्यापेक्षा जास्त मूल्यांच्या नोटा जर 35 टक्केपेक्षा जास्त फाटल्या असतील, तर पूर्ण पैसे मिळणार नाहीत.
नोटांवर लिहिलं असेल तर काय होईल?
अनेकांना नोटांवर काहीतरी लिहिण्याची सवय असते. जर अशी नोट तुमच्याकडे आली तर त्या नोटेचं काय करायचं? असा प्रश्न पडू शकतो. अशा नोटा बँकेत जमा केल्यास, त्या तुम्हाला बदलून मिळणार नाहीत, पण तुमच्या खात्यावर जमा होतील.