नवी दिल्ली : केंद्र सरकारने करदात्यांना दिलास देत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवली आहे. आता 31 मार्च 2018 पर्यंत आधार आणि पॅन लिंक करता येऊ शकतं. याआधी ही मुदत 31 डिसेंबर 2017 होती.
केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने यासंदर्भातील परिपत्रक जारी केलं आहेत. काही करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.
सरकार आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवणार!
सरकारने आयकर कायद्याच्या कलम 139 अअ अंतर्गत देशातील सर्व करदात्यांना पॅन आणि आधार लिंक करणं अनिवार्य केलं होतं. यापूर्वी लिंकिंग प्रक्रियेसाठई 31 ऑगस्ट 2017 ची तारीख निश्चित केली होती. पण ती वाढवून 31 डिसेंबर करण्यात आली होती. काही करदात्यांनी अजूनही आधार आणि पॅन लिंक केलेलं नाही, असं सरकारने सांगितलं आहे.
आता ही मुदतही वाढवून 31 मार्च 2018 करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या :
आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका!
मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा
आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट
सिम कार्ड- आधार कार्ड 6 फेब्रुवारीपर्यंत लिंक करा, अन्यथा मोबाईल बंद!
आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली
बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?
बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पॅन-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Dec 2017 01:38 PM (IST)
काही करदात्यांना पॅन-आधार लिंक करण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याने केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -