यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
मात्र यावेळी प्रकर्शाने जाणवणारी बाब म्हणजे शिवसेनेची अनुपस्थिती होय. या कार्यक्रमासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हतं.
कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत.
कोण आहेत रामनाथ कोविंद?
- रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 उत्तरप्रदेशच्या कानपूर जिल्ह्यातील परौख गावी जन्म.
- कानपूर विद्यापीठातून एलएलबीची पदवी
- 1977 ते 1979 मध्ये दिल्लीच्या हायकोर्टात वकिली.
- 1994 आणि 2000 साली उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर नियुक्ती
- भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून काम पाहिलं
- भाजप दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष
- 8 ऑगस्ट 2015 पासून बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत
यूपीएकडून मीरा कुमार यांचं आव्हान
दरम्यान, या निवडणुकीसाठी एनडीएच्या रामनाथ कोविंद यांना आव्हान देण्यासाठी काँग्रेसपणीत यूपीएने माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना मैदानात उतरवलं आहे.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल.
सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.
संबंधित बातम्या
राष्ट्रपती निवडणूक : काँग्रेसकडून मीराकुमार यांना उमेदवारी
रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार!
रामनाथ कोविंद यांना JDU-BJD नंतर TRS चंही समर्थन
घटना बदलण्यासाठीच भाजपकडून राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार : प्रकाश आंबेडकर
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्याबाबतच्या 10 खास गोष्टी