अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने 2007 आणि 2012 ची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेससोबत आघाडी करुन लढवली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार निवडणून आले होते.
दोन्ही पक्षातील तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त जागा मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यास तयार केली असल्याचं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, काँग्रेसने रविवारी आपल्या 77 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. ज्या जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितल्या होत्या, त्या जागांचाही काँग्रेसच्या 77 उमेदवारांच्या यादीत समावेश आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते आशोक गेहलोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. “राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद ओळखूनच जागांची मागणी करायला पाहिजे होती. तेव्हाच तिकीट वाटपाचा योग्य फॉर्म्युला अस्तित्त्वात आला असता,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
गुजरात निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 9 तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 18 डिसेंबर रोजी होईल.
संबंधित बातम्या
गुजरात : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, हार्दिकच्या निकटवर्तीयांना तिकीट
गुजरात विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2017 09:49 PM (IST)
गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाची बोलणी फिस्कटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व 182 जागांवर उमेदवार उतरवणार आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -