राजकोट : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या हिवाळी अधिवेशनासंदर्भातील आरोपांवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी पलटवार केला आहे. निवडणूक कार्यक्रम लक्षात घेऊन आजपर्यंत अनेकदा संसदेच्या अधिवेशनाची वेळ बदलण्यात आली आहे. काँग्रेसनेही यापूर्वी अनेकवेळा अधिवेशनाच्या वेळा बदलल्या आहेत.


“विद्यमान विरोधी पक्षाने 2011 मध्ये संसदेचं अधिवेशन लांबणीवर टाकलं होतं. यापूर्वीही असं अनेकदा झालं आहे. त्यामुळे ही परंपरा चालत आली आहे,” असं म्हणत अरुण जेटलींनी काँग्रेसवर पलटवार केला.

अरुण जेटली पुढे म्हणाले की, “गेल्या 10 वर्षातील केंद्रातील सरकार सर्वात भ्रष्ट सरकार होतं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या तीन वर्षात सर्वात प्रामाणिक आणि भ्रष्टाचार विरहित सरकार दिलं. खोटं कितीही दरडावून सांगितलं तर ते खरं होत नाही.”

दरवर्षी संसदेचं हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात आयोजित केलं जातं. आणि डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत हे अधिवेशन चालतं. दरम्यान, सरकार सध्या दहा दिवसांचं हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याच्या तयारीत आहे. ज्याची सुरुवाती डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी, विरोधकांचा सामना करण्याची पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत नसल्याने ते लांबणीवर टाकत असल्याचा आरोप केला.

संबंधित बातम्या

जीएसटी अर्ध्या रात्री लागू करता, मग अधिवेशन का लांबवलं? : सोनिया गांधी