नवी दिल्ली : गुजरातमधील राज्यसभा निवडणुकीच्या अवघ्या काही तास आधी सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांना मोठा झटका बसला आहे.
'पक्षानं भाजपला मतदान करायला सांगितलं आहे.' असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे. त्यामुळे आता ऐनवेळी काँग्रेसच्या अडचणीत मोठी भर पडली आहे.
काँग्रेसचे गुजरातमधील सहा आमदार भाजपनं फोडल्यानंतर अहमद पटेल यांची सारी भिस्त राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, ऐनवेळी भूमिका बदलून राष्ट्रवादीनं भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतल्यानं पटेलांची वाट आणखी बिकट झाली आहे.
राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये दोन आमदार आहेत. आज संध्याकाळी उशीरापर्यंत राष्ट्रवादीनं याबाबत कोणताही व्हीप जारी केला नव्हता. पण मतदानासाठी अवघे काही तास उरलेले असताना राष्ट्रवादीनं काँग्रेसला मोठा धक्का दिला.
भाजपकडून अमित शहा, स्मृती इराणी यांचा विजय पक्का आहे. पण काँग्रेसचे फुटीर आमदार बलवंतसिंह राजपूत यांच्या रुपानं तिसरा उमेदवार रिंगणात उतरवून भाजपनं अहमद पटेलांची पुरती नाकाबंदी केली आहे.
शंकरसिंह वाघेला यांच्या बंडाळीचा फायदा घेत भाजपनं काँग्रेसचे आत्तापर्यंत सहा आमदार फोडले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या 57 वरुन 51 वर पोहचली आहे. अहमद पटेल यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीच्या 45 मतांची गरज आहे. काँग्रेसनं आपल्या 44 आमदारांना गेल्या आठवडाभरापासून बंगळुरुच्या रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या आमदारांना सोमवारी गुजरातमध्ये आणलं गेलं. आणंद इथल्या रिसॉर्टमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली असून इथून थेट मतदानालाच त्यांना आणलं जाईल.
संबंधित बातम्या :
प्रतिष्ठेच्या लढतीत अहमद पटेलांची भिस्त राष्ट्रवादीवर
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रवादीचा भाजपला पाठिंबा, अहमद पटेलांना दे धक्का!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Aug 2017 09:54 PM (IST)
'पक्षानं भाजपला मतदान करायला सांगितलं आहे.' असा दावा गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा यांनी केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -