रक्षाबंधनातून सामाजिक संदेश, भावाकडून बहिणीला 'शौचालय' भेट
एबीपी माझा वेब टीम | 07 Aug 2017 03:44 PM (IST)
भाऊ बहिणीला पैसे, कपडे, मोबाईल, दागिने, गाड्या यांसारख्या अनेक वस्तू भेट देतो. परंतु लखनौमधील एका भावाने बहिणीला राखीपौर्णिमेला अनोखी भेट दिली आहे.
लखनौ : रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण. या सणाला भाऊ बहिणीला पैसे, कपडे, मोबाईल, दागिने, गाड्या यांसारख्या अनेक वस्तू भेट देतो. परंतु लखनौमधील एका भावाने बहिणीला राखीपौर्णिमेची भेट म्हणून चक्क शौचालय दिलं आहे. गोंडा जिल्ह्यातील रुद्रगड नौसी गावात एका भावाने आपल्या बहिणीला अनोखी भेट दिली आहे. घरात शौचालय नसल्याने त्याच्या बहिणीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होतं. त्यामुळे बहिणीला त्याने शौचालयच भेट दिलं. मी माझ्या बहिणीला अडचणीत पाहू शकत नाही, असं या भावाने सांगितलं. त्याने या शौचालयाला राखी शौचालय असं नाव दिलं आहे. एका भावाची ही भेट प्रत्येक घरात शौचालयाच्या गरजेवर प्रकाश टाकतो.