नवी दिल्ली : NCERT च्या बारावीच्या राज्यशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात अयोध्या वादावरील मजकूर बदलला आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्याचा संदर्भ तीन ठिकाणांहून हटवला आहे. दंगलींच्या संदर्भात पीडितांच्या धर्माचा उल्लेख देखील टाळण्यात आला आहे. रामजन्मभूमी आंदोलन आणि 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भर देण्यात आला आहे. तसंच पुस्तकातून गुजरात दंगलीवरील परिच्छेद हटवला आहे. पूर्वीच्या पुस्तकात 'मुस्लीम विरोधी गुजरात दंगल' असा उल्लेख होता. महिन्याभरात अभ्यासक्रमात नवे पुस्तक अपेक्षित आहे.  


NCERT ने गुरुवारी (4 एप्रिल) आपल्या वेबसाइटवर हे बदल जाहीर केले आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी (CBSE) संलग्न शाळांमध्ये NCERT पुस्तके वापरली जातात. देशातील CBSE बोर्डाशी संलग्न शाळांची संख्या जवळपास 30 हजारांवर आहे. CBSE बोर्डाच्या शाळा भारताच्या जवळजवळ प्रत्येक भागात आहेत. इतर राज्यांच्या बोर्डांच्या पुस्तकांमध्येही आगामी काळात  बदल दिसून येतील.


अयोध्येवर काय लिहिले होते? 


हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, बारावीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकानुसर 'भारताचे राजकारण-नवा अध्याय' या आठव्या धड्यामध्ये अयोध्या वादाचा मजकुर हटवण्यात आला आहे. या धड्यातील 'राम जन्मभूमी आंदोलन आणि अयोध्या वादावरील वादग्रस्त मजकूर हटवण्यात आला आहे. या विषयी NCERT चे म्हणणे आहे की, काळानुरुप बदल करण्यात आले आहेत.   


गुजरात दंगलीसह हे विषय बदलण्यात आले


'भारताचे राजकारण-नवा अध्याय' या धड्यातील बाबरी मशीद आणि 'हिंदूत्वाचे राजकारण'चे संदर्भही काढून टाकण्यात आले आहेत. या धड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर कसे बांधले गेले हे देखील स्पष्ट केले आहे. 'डेमोक्रेटिक राइट्स' या शिर्षकाच्या पाचव्या प्रकरणात गुजरात दंगलीचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. एनसीईआरटीचे म्हणणे आहे की, ही घटना 20 वर्षे जुनी आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेद्वारे न्यायनिवाडा करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या