मुंबई : स्वदेशी बनावटीची आयएनएस विशाखापट्टणम ही अत्याधुनिक युद्धनौका आज भारतीय नौदलात दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत रविवारी मुबईत झालेल्या एका कार्यक्रमात ही युद्धनौका नौदलात दाखल झाली. यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढणार आहे. विशाखापट्टणम' ही विनाशिका माझगाव डॉकने तयार केली आहे. 


बराक, ब्राम्होस, अॅन्टी सबमरिन, रॉकेट लॉन्चर अशा अनेक सुविधांनी सुसज्ज असलेल्या आएनएस विशाखापट्टणममुळे शत्रूच्या उरात धडकी भरणार आहे. विशाखापट्टणमचे वजन तब्बल साडेसात हजार टन इतकं आहे आणि त्याची लांबी 164 मीटर इतकी आहे. कुठल्याही रडारमध्ये सहज टिपली जाणार नाही, हे 'विशाखापट्टणम'चे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.


अशी आहे आयएनएस विशाखापट्टणम



  • समुद्रात मारा करण्यासाठी युद्धनौकेवर 16 ब्रह्मोस क्षेपणास्त्र बसवण्यात येतील.

  • आकाशात मारा करण्यासाठी एकूण 32 बराक क्षेपणास्त्र, 76 मिमी तोफ, एके 630 तोफ बसवण्यात येणार.

  • पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर, 300 किमी परिघातील माहिती टिपण्यासाठी टेरमा रडार, इलेक्ट्रॉनिक टेहळणीसाठी शक्ती रडार यंत्रणा असेल.

  • हवाई हल्लाविरोधी रॉल 02 यंत्रणा, कवच ही युद्ध व्यूहरचना प्रणाली.

  • अत्याधुनिक टेहळणी व शत्रूच्या रडारपासून बचाव करणारी एमएफ स्टार यंत्रणा.


येत्या 25 नोव्हेंबर रोजी स्कॉर्पीन क्लासची चौथी पाणबुडी आयएनएस वेला भारताची समुद्रातील ताकद वाढवणार आहे. या कार्यक्रमाला नौदलानचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह प्रमुख पाहुणे असणार आहेत. प्रोजेक्ट-75 अंतर्गत सहा पाणबुड्यांची बांधणी करण्यात येत आहे. या पाणबुड्यांची बांधणी मुंबईतल्या माझगाव डॉक लिमिटेड(एमडीएल) येथे करण्यात येत आहे. फ्रेंच बनावटीच्या स्कॉर्पिन श्रेणीतील पाणबुड्यांच्या धर्तीवर त्या बांधण्यात येत आहेत


संबंधित बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha