पणजी : नौदलाच्या दाबोळी विमानतळावर आज दुपारी ‘मिग-29 के’ लढाऊ विमान कोसळून अपघात झाला. कोसळताच विमानाने पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखून पायलट सुखरुपपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाला.


‘मिग-29 के’ कोसळल्यानंतर काही काळ दाबोळी विमानतळाची धावपट्टी बंद ठेवण्यात आली होती. सुरक्षात्मक उपाय योजल्यानंतर धावपट्टी पुन्हा खुली करण्यात आली.

‘मिग-29 के’ विमान कोसळल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या अपघातामुळे दाबोळी विमानतळावरुन उड्डाण करणारी काही विमाने उशिराने सोडण्यात आली.