नवी दिल्ली : नवरात्रौत्सवाला आजपासून (गुरुवार) सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोघेही आजपासून पुढील 9 दिवस उपवास करणार आहेत.


पंतप्रधान मोदी गेल्या अनेक वर्षांपासून नवरात्रीचे उपवास करतात आणि पहिल्या दिवशी देवीची विशेष पूजा करून फक्त पाण्याचं सेवन करुन उपवास करतात आणि नवरात्रीतील नऊही दिवस देवीची आराधना करतात. नवरात्रींच्या उपवासामध्येही पंतप्रधान मोदी अनेक तास कामही करतात. यावेळी नवरात्रौत्सवादरम्यान मोदी दोन दिवस वाराणसी दौऱ्यावर देखील जाणार आहेत.

तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपवास करणार असून आज गोरखनाथ मंदिरात जाऊन घटस्थापना करणार आहेत.