पंजाबमध्ये मोठा राजकीय बदल, सिद्धूच्या पक्षाला पत्नीची सोडचिठ्ठी
एबीपी माझा वेब टीम | 23 Nov 2016 11:07 PM (IST)
चंदीगड : पंजाब निवडणुकांच्या तोंडावर आवाम-ए-पंजाब पक्षाची स्थापना करणाऱ्या नवजोत सिंह सिद्धू यांच्या पत्नी डॉक्टर नवज्योत कौर आता काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. माजी हॉकी खेळाडू परगट सिंह देखील काँग्रेसमध्ये दाखल होणार आहेत. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंह यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला त्या काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतील. नवजोत सिंह यांनी भाजपची साथ सोडण्यापूर्वी नवजोत कौर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर नवजोत सिंहांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि आवाम ए पंजाब पक्षाची स्थापना केली. पण निवडणुकीच्या आधीच त्यांच्या पत्नीने काँग्रेसची वाट धरली आहे. त्यामुळे सिद्धू काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्वाचं आहे.