नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रावरही सकारात्मक परिणाम झाले आहेत. प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील 15 दिवसांत तब्बल 21 हजार कोटी रूपये जमा झाले आहेत.

जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्यातून जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे.

असंघटीत क्षेत्रातील लोकांना बँकिंग व्यवहाराची सवय लागावी यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजना लागू केली होती. या योजनेतंर्गत शून्य बॅलन्सने खातं उघडण्यात आलं.

दरम्यान बँकांमध्ये नोटाबंदीनंतर आतापर्यंत 5 लाख कोटी जमा झाल्याची माहिती तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. बँकांमध्ये रक्कम जमा झाल्यामुळे व्याजदर कमी होतील, असे संकेतही त्यांनी दिले होते.