नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावादरम्यान पाकिस्तानी सिनेमे आणि कलाकार यांच्यावर बंदी घालण्याचा कसलाही विचार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
लोकसभेत आज खासदार योगी आदित्यनाथ, आर, ध्रुवनारायण आणि नित्यानंद राय यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारने हे सष्टीकरण दिलं.
पाकिस्तान आणि भारत यांच्यात सीमेवरील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सिनेमे आणि कलाकारांवर बंदी विचाराधीन आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता.
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांचा देशभरातून विरोध होत आहे. मुंबईत मनसेने इशारा दिल्यानंतर जवळपास सर्व पाकिस्तानी कलाकार भारत सोडून गेले आहेत. मात्र यावर सरकारकडून तूर्तास तरी बंदीचा विचार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं.