पणजी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांच्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला. आता यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनीही आरक्षणाचा दुरुपयोग होत असल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून दिली आहे. यासोबतच त्यांनी शोषित आणि वंचित घटकासाठी आरक्षण आवश्यक असल्याचं मतही यावेळी नोंदवलं.


गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या युवा संमेलनात तरुणांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, ''आरक्षणाचा गैरवापर होतोय. पण समाजातील शोषित आणि वंचित घटकाची स्थिती सुधारण्यासाठी त्याची गरज आहे.''

देशात आरक्षण लागू करण्यापाठीमागे सामाजिक उत्थानाचा उद्देश होता. त्यामुळे आरक्षण गरजेचेच असल्याचं मतं त्यांनी यावेळी मांडलं.

शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी जयपूरमध्ये आयोजित लिटरेचर फेस्टिवलमध्ये बोलताना, देशातून सगळ्या प्रकारच्या आरक्षणाचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे, असं मत नोंदवलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ उडाली.

संबंधित बातम्या

'देशातून आरक्षण हद्दपार करा', RSSच्या मनमोहन वैद्यांचं वक्तव्य

मनमोहन वैद्य यांच्यानंतर आता मा. गो. वैद्यही आरक्षणावर बोलले!

‘संघाचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे.’