नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. ईडीने मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी त्यांना समन्स बजावलं होतं. परंतु सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप त्यांचा अहवाल निगेटिव्ह न आल्यामुळे त्या चौकशीसाठी हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे.


दरम्यान ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावून 8 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. सोनिया गांधी ईडीसमोर ठरलेल्या दिवशी चौकशीसाठी हजर राहतील असं पक्षातर्फे सांगण्यात आलं होतं. परंतु कोरोनामुळे सोनिया गांधी उद्या चौकशीसाठी गैरहजर राहण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, सोनिया गांधी ईडीसमोर हजर राहण्याची शक्यता नाही. मागील आठवड्यातच त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या प्रकृतीचं कारण देत ईडीकडे चौकशीसाठी गैरहजर राहण्याची सूट मागितली जाईल. दरम्यान, त्यांच्याशिवाय इतर काँग्रेस नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.


दरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलं होतं. राहुल गांधी परदेश दौऱ्यावर असल्याने 8 जूनपर्यंत परतल्यास ते चौकशीसाठी हजर राहतील असं पक्षाकडून सांगण्यात आलं होतं. परंतु राहुल गांधी यांच्या हजर होण्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. आता ते 13 जून रोजी ईडीसमोर हजर राहतील.


काँग्रेसची केंद्र सरकारसह ईडीवर टीका
ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारसह ईडीवर निशाणा साधला होता. काँग्रेसने हे सूडाचं राजकारण असल्याचे म्हटलं. आम्ही ईडीच्या नोटीशीला घाबरणार नाही आणि केंद्र सरकारसमोर झुकणार नाही, असं रणदीप सुरजेवाला म्हणाले. "या कटामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची पाळीव यंत्रणा ईडी आहे. सूडाच्या भावनेत मोदी सरकार आंधळी झाली आहे. नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 1942 मध्ये स्थापन करण्यात आलं होतं. त्यावेळी ब्रिटीश सरकारने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला आणि आता मोदी सरकार ईडीचा वापर करत आहे," असा आरोप रणदीप सुरजेवाला यांनी केला.


काय आहे प्रकरण?
नॅशनल हेराल्ड' हे वर्तमानपत्र पंडित जवाहरलाल नेहरु यांनी सुरु केलं होतं. हे काँग्रेसचं मुखपत्र समजलं जायचं. काही काळातच हे वर्तमानपत्र बंद पडलं. मात्र, 2012 मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांच्या 'यंग इंडिया' या कंपनीने या वर्तमानपत्राचे हक्क पुन्हा विकत घेतले. मात्र, हे सुरु करण्यात आलं नव्हतं. हे हक्क घेताना 1600 कोटींची संपत्ती फक्त 50 लाखांत घेतल्याचा आरोप भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला होता. त्या प्रकरणी चौकशी सुरु आहे.


संबंधित बातम्या



बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 


यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.