Amazing Photo of Jupiter: गुरूचे (Jupiter) वादळी ग्रेट रेड स्पॉट, त्याचे वलय, चंद्र, उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील प्रतिबिंब आजपर्यंत एका चित्रात दिसत नव्हते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (James Webb Space Telescope) ने गुरू ग्रहाचे इतके विलोभनीय छायाचित्रे घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामध्ये गुरू ग्रहाचे दोन छोटे उपग्रह आणि त्यामागील आकाशगंगा देखील पूर्णपणे दिसत आहेत. हे एक अप्रतिम चित्र आहे. गुरु ग्रहाचे असे चित्र आतापर्यंत घेतले गेले नव्हते. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने काढलेले हे चित्र पाहता गुरूला सौरमालेचा राजा म्हणता येईल. या चित्रात ज्या बारीकसारीक गोष्टी दिसल्या आहेत त्या आजवर कोणत्याही अवकाशयानाने किंवा दुर्बिणीने पाहिल्या नव्हत्या. तर नासाने (NASA) जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने टिपलेल्या गुरूच्या नवीन आश्चर्यकारक प्रतिमा पोस्ट केल्या आहेत.






 


गुरू ग्रहाची इतर अनेक वैशिष्ट्ये समोर


हे चित्र जेम्स वेबने 27 जुलै 2022 रोजी काढले होते. या चित्राचे स्वरूप इन्फ्रारेड होते. नंतर कॅलिफोर्नियाच्या नागरिक शास्त्रज्ञ जूडी स्मित यांनी या फोटोवर प्रक्रिया करून हे चित्र जगासमोर आणले. जे आश्चर्यकारक होते. या चित्रात गुरू ग्रहाची इतर अनेक वैशिष्ट्ये समोर आली आहेत. ग्रेट रेड स्पॉट दिसत आहे. गुरूच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर अरोरा म्हणजेच उत्तरीय आणि दक्षिणीय लाइट्सची चमक दिसते. याशिवाय, या चित्रात, या ग्रहाचे सर्व भाग एका रेषेत दिसतात. त्याचे मंद वलय, त्याचे दोन उपग्रह म्हणजे अमरथिया आणि अॅड्रास्टेआ हे चंद्र. त्यांच्या मागे आकाशगंगेत चमकणारे तारे दिसतात.


गुरूची अशी प्रतिमा आजपर्यंत पाहिली नाही. 
कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कलेचे प्रोफेसर आणि प्लॅनेटरी अॅस्ट्रोनोमर इम्के डी पेटर यांनी सांगितले की, गुरूची अशी प्रतिमा आजपर्यंत आपण पाहिली नाही. ते अप्रतिम आणि अतुलनीय आहे. त्याचे तपशील इतके सुरेख आहेत की आपण सर्वकाही स्पष्टपणे पाहू शकतो. प्रो. इमके डी पेटरने जूडी स्मितसह या चित्रावर प्रक्रिया केली आणि नंतर ते 22 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले


गुरू ग्रह अशा प्रकारे दिसणे अपेक्षित नव्हते
इमके डी पेटर यांनी सांगितले की, गुरू ग्रह अशा प्रकारे दिसणे अपेक्षित नव्हते. JWST च्या नियर इन्फ्रारेड कॅमेरा (NIRCam) ने गुरू ग्रहाचे वाईड फिल्ड दृश्य देखील घेतले आहे. ज्यामध्ये त्याचे वलय आणि दोन्ही चंद्र दिसत आहेत. शास्त्रज्ञांनी सांगितले की, जेम्स वेबचा इन्फ्रारेड कॅमेरा किती संवेदनशील आहे याचा पुरावा हे चित्र पाहून मिळत आहे


गुरूचे चंद्र 200 आणि 20 किलोमीटर दूर
गुरू ग्रहाच्या कड्या त्याच्या प्रकाशापेक्षा एक दशलक्ष पटीने मंद आहेत. अमाल्थिया आणि अॅड्रास्टिया हे चंद्रही ग्रहापासून अनुक्रमे 200 आणि 20 किलोमीटर दूर आहेत. असे तपशील एकत्र करणे खूप कठीण आहे. ज्युडी स्मितने सांगितले की, जेव्हा मी पहिल्यांदा या फोटोवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा मला समजले की तो किती सुंदर असणार आहे या चित्रावर प्रत्येक प्रकारे प्रोसेसिंग केली आणि तुमच्यासमोर जे समोर आले ते सर्वोत्कृष्ट आहे. असे सांगितले