नवी दिल्ली : डोपिंगच्या आरोपातून मुक्त झाल्यानंतर पैलवान नरसिंग यादवने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधानांनी आशीर्वाद दिल्याचं नरसिंगने सांगितलं. शिवाय माझ्यासह इतरांवर अन्याय होणार नाही, असा विश्वासही मोदींनी दिल्याचं नरसिंह यादव म्हणाला.
नरसिंग देशाच्या गौरवासाठी जिंकेल, अशी आशा पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. तसंच कोणत्याही तणावाशिवाय रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी हो, असा सल्ला मोदींनी नरसिंगला दिला. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर नरसिंग यादवची रिओ ऑलिम्पिकमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होईन आणि देशासाठी पदक जिंकेन, यावर मला विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया नरसिंगने भेटीनंतर व्यक्त केली.
डोपिंग प्रकरणात नाडाने नरसिंग यादवची निर्दोष मुक्तता केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी त्याचं अभिनंदन केलं होतं. तर "सत्य समोर आणण्यासाठी मी पंतप्रधान आणि कुस्ती संघाचे आभार मानतो. माझ्यासाठी अतिशय कठीण काळ होता, अखेर मी निर्दोष सिद्ध झालो," अशा शब्दात नरसिंगने पंतप्रधानांचे आभार मानले होते.
संबंधित बातम्या: