मुंबई: 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. गेल्या वर्षीपासून याच दिवशी केंद्र सरकारनं योग दिन साजरा करण्यास सुरुवात केली. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत राजपथावर 35 हजार लोकांसोबत योगासन केलं होतं. यंदाही 21 जूनला योग दिन साजरा करण्यात येणार आहे.


 

योगाचं महत्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. पंतप्रधान मोदी देखील याचा प्रचार करीत आहेत. आता मोदींनी याच्या प्रचारासाठी थेट सोशल मीडियाचा वापर सुरु केला आहे. जेणेकरुन योग आणि त्यामुळे होणारे फायदे हे अनेक लोकांपर्यंत पोहचवता येणार आहे.

 

मोदींनी ट्विटरवरुन योगचा प्रसार आणि प्रचार सुरु केला आहे. दररोज एक योगासनाचा व्हिडिओ ते अपलोड करीत आहे. वेगवेगळी योगासनं ते अपलोड करणार आहेत. आतापर्यंत त्यांनी तीन आसनांचे व्हिडिओ अपलोड केले आहेत.

 

आज 4 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योग ट्वीट मालिकेत त्रिकोणासनाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे.


 

3 जूनला मोदींनी योगाचा तिसरा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये वक्रासन या आसनाचं प्रात्यक्षित  दाखविण्यात आलं आहे.



2 जूनला मोदींनी योगाचा दुसरा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये भुजंगासन या आसनाचं प्रात्यक्षित  दाखविण्यात आलं आहे.



 

1 जूनला मोदींनी योगाचा पहिला व्हिडिओ शेअर केला. यामध्ये वृक्षासन या आसनाचं प्रात्यक्षित  दाखविण्यात आलं आहे.