नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी आज सर्व एनडीए खासदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील भाजप , शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदारांनी डिनरला हजेरी लावली. एनडीएचे खासदार वेगवेगळ्या गटानं बसमधून  7 लोककल्याण मार्ग येथे पोहोचले. बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएनं विजय मिळवल्यानंतर या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं 243 पैकी 202  जागांवर विजय मिळवला. एनडीएच्या खासदारांसाठी कोणते मेन्यू होते हे समोर आलं आहे. महाराष्ट्रातील राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. 

Continues below advertisement

कुटुंबात जसं स्नेहभोजन असतं तसं जेवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं, असं राज्यसभा खासदार अजित गोपछडे यांनी म्हटलं. जेवणात प्रत्येक राज्याची विविधता होती... म्हणजे जम्मू काश्मीर ते केरळ या सगळ्या राज्यांचे पदार्थ आजच्या जेवणात होते. घरच्या जेवणाची आठवण मोदींच्या घरी जेवण करून झाली, असं गोपछडे यांनी म्हटलं.  प्रत्येक टेबलवर येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक खासदारांची अस्थेवाइकपने चौकशी केली, असं गोपछडे यांनी सांगितलं.

कुठलीही राजकीय चर्चा न करता कौटुंबिक सोहळा आज मोदींच्या घरी पार पडला. आजच जेवण म्हणजे कुठल्याही राजकीय हेतूने आयोजित केलेल नव्हतं.महाराष्ट्राची शेंगदाणा चटणी, वेगवेगळे ठेचे, ज्वारीची भाकरी हे जेवणात विशेष होतं. देशाला एकतेचा संदेश आजच्या भोजनातून मिळाला अस एक प्रकारे म्हणता येईल, अशी भावना अजित गोपछडे यांनी व्यक्त केली. 

Continues below advertisement

Narendra Modi hosts Dinner : नरेंद्र मोदींकडून सर्व खासदारांना जेवणासाठी आग्रह

सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांची डिनर टेबलवर भेट घेतली. सर्व खासदारांची विचारपूस केली आणि त्यांना आग्रहानं भोजन करायला लावलं.  एका टेबलवर 5 खासदार आणि एक मंत्री अशी रचना करण्यात आली होती. एका टेबलवर वेगवेगळ्या राज्यातील खासदारांची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामुळं खासदारांमधील संपर्क वाढेल. 

नरेंद्र मोदी यांनी स्नेहभोजनानंतर एक्सवर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये  म्हटलं की लोक कल्याण मार्गावरील 7 नंबर हॉटेलमध्ये एनडीएच्या खासदारांना रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित करणं आनंददायी अनुभव होता. एडीए परिवार सुशासन, राष्ट्रीय विकास आणि प्रादेशिक आकांक्षासाठी कटिबद्ध आहे. आपण सर्वजण मिळून राष्ट्र विकासासाठी सातत्यानं प्रयत्न करत राहू असं मोदींनी म्हटलं. 

खासदारांना जेवणासाठी मेन्यू काय होता?

काश्मीरचा कहावा, बंगालचा रसगुल्ला, पंजाबची मिस्सी रोटी, आल्यासह संत्र्यांचा रस,सब्ज बदाम शोरब, काकुम मटर अखरोटची शम्मी,कोथिंबीर वडी, गोंगुरा पनी,  खुबानी मलाई कोफ्ता, गाजर मेथी मटर,  भेंडी सांभरिया, पालकुरा पप्पू, काले मोती चिलगोजा पुलाव, रोटी, बेक्ड पिस्ता लेंग्चा, अडा प्रधनम आणि खीर यासह इतर पदार्थ स्नेहभोजनात होते.