मोदींकडून रेणुका चौधरींची तुलना शूर्पणखेशी, काँग्रेसचा गोंधळ
एबीपी माझा वेब टीम | 08 Feb 2018 12:43 PM (IST)
मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या.
नवी दिल्ली : काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांच्या हास्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टिपण्णी केल्यानंतर आता काँग्रेस आक्रमक झालीय. नरेंद्र मोदींनी माफी मागावी, यासाठी काँग्रेसनं राज्यसभेत गोंधळ घातला. त्यामुळे राज्यसभेचं कामाकाज एका तासासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. सभापती व्यंकय्या नायडू यांनी चौधरींच्या हास्यावर नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी व्यंकय्या नायडूंना मध्येच थांबवलं. 'रेणुकाजींना काहीही बोलू नका, अशी माझी सभापतींना विनंती आहे. 'रामायण' मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी असं हास्य ऐकण्याचं भाग्य लाभलं' असा टोला मोदींनी लगावला. रेणुका चौधरी यांच्या हसण्याची तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली.