नवी दिल्ली : लोकसभेत संविधानाच्या 75 वर्षांच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली.  याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 


नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की मी संविधानामुळं इथपर्यंत पोहोचलो आहे, संविधानामुळं आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले, असं म्हटलं. जवाहरलाल नेहरु यांनी 1951 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली.  


नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की काही लोकांनी अपयशाचं दु:ख प्रकट केलं. या देशाच्या जनतेला नमन करतो, ते संविधानासोबत राहिले आहेत, असं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का देण्यामध्ये गेल्या 55 वर्षात काही सोडलं नाही. काँग्रेसच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला गेला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आलं होतं, असा आरोप मोदींनी केला.  


पीएम मोदी यांनी म्हटलं की, " जेव्हा देश संविधानाची 25 वर्ष पूर्ण केली होती त्यावेळी आमच्या देशात संविधानाला नख लावण्यात आलं. देशात आणीबाणी लावण्यात आली. पत्रकारितेचं स्वातंत्र्य संपवण्यात आलं, काँग्रेसचं हे पाप कधी धुतलं जाणार नाही, अशी टीका मोदी यांनी केली. 
 
जवाहरलाल नेहरु यांनी त्यावेळी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहून मुख्यमंत्र्यांना म्हटलं की संविधान आपल्या रस्त्यात आलं तर कोणत्याही परिस्थितीत संविधानात बदल करावा लागेल, असं म्हटलं होतं. काँग्रेसनं वेळोवेळी संविधानावर हल्ले केले. 60 वर्षात 75 वेळा संविधान बदलण्यात आलं, असं नरेंद्र मोदी म्हणाले.  


जवाहरलाल नेहरु यांनी 1951 मध्ये मागच्या दारानं संविधान बदललं. नेहरु आपलं संविधान चालवत होते. इंदिरा गांधी यांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला, आणीबाणी लागू करुन अधिकार हिरावून घेण्यात आले.  न्यायव्यवस्थेचा गळा घोटण्यात आला. खुर्ची वाचवण्यासाठी आणीबाणी लावण्यात आली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.  


तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी नायासाठी लढणाऱ्या महिलेऐवजी कायदा करुन कट्टरपथीयांना साध दिली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.  एका अहंकारी व्यक्तीनं कॅबिनेटचा निर्णय पत्रकार परिषदेत फाडून टाकला, यानंतर कॅबिनेटनं त्यांचा निर्णय बदलला, मी जे बोलेन तेच होईल, असं सविधानासोबत होत राहिलं, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली. 



इतर बातम्या : 


Shrikant Shinde : संविधानावरील चर्चेदरम्यान श्रीकांत शिंदेंचा हल्लाबोल, राहुल गांधी ताडकन उठले अन्...; संसदेत मोठा गदारोळ