नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (05 मे) एक अॅनिमेटेड व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींचे अॅनिमेटेड व्हर्जन पाहायला मिळत आहे. मोदी यामध्ये योगासने करत आहेत. मोदींनी या व्हिडीओद्वारे 21 जून रोजी साजरा केला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. मोदींनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये ते त्रिकोणासन करत असल्याचे पाहायला मिळत आहेत.

व्हिडीओ शेअर करताना मोदींनी म्हटले आहे की, 21 जून रोजी आपण योग दिन साजरा करणार आहोत. मी आवाहन करतो की, तुम्ही सर्वांनी योगाला तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनवा. इतरांनाही योग करण्यासाठी प्रेरित करा. योगाचे फायदे खूप जबरदस्त आहेत.

21 जून 2015 रोजी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला गेला. 21 जून हा दिवस वर्षातला सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस माणसाचे दिर्घायुष्य दर्शवतो. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे.


केंद्र सरकारतर्फे नवी दिल्ली, शिमला, म्हैसूरु, अहमदाबाद आणि रांचीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिला मोठा सार्वजनिक कार्यक्रम आहे.


संपूर्ण व्हिडीओ पाहा