नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चेसाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. मोदी आणि पुतीन यांची बैठक आज दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये होईल. उभय देशांमध्ये एस-400 वायु संरक्षण प्रणालीसह अंतराळ आणि ऊर्जा क्षेत्रातील महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे.
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पुतीन यांचं भारतात स्वागत केलं. त्यानंतर पुतीन मोदींच्या लोक कल्याण मार्गावरील निवासस्थानी गेले आणि त्यानंतर त्यांची बैठक झाली. 19 व्या भारत-रशिया शिखर संमेलनात द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर व्यापक चर्चा होणार आहे, ज्यामध्ये रशियावर अमेरिकेने लावलेल्या सँक्शनचाही समावेश असेल.
पुतीन यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे, ज्यामध्ये उपपंतप्रधान युरी बोरीसोव, परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव आणि उद्योग मंत्री डेनिस मंतुरोव यांचा सहभाग आहे.
रशियन मीडियाकडून एस-400 वर शिक्कामोर्तब
पुतीन भारतात पोहोचताच रशियान वृत्तसंस्था ‘तास’ने वृत्त दिलं आहे, की दोन्ही देशांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होणार आहेत. ज्यामध्ये भारताला एस-400 वायु संरक्षण प्रणाली देण्यासाठी 39 हजार कोटींच्या कराराचाही समावेश आहे. संरक्षण, अंतराळ, व्यापार, ऊर्जा आणि पर्यटन यांसारख्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी केली जाईल.
अमेरिकेचा दबाव झुगारुन करार
रशिया आणि भारताच्या या करारात सर्वांचं लक्ष असेल ते म्हणजे एस-400 वायु संरक्षण प्रणालीच्या कराराकडे. कारण रशियाकडून शस्त्र खरेदी करणं हे अमेरिकेच्या नियमांच्या विरोधात आहे. अमेरिकेच्या दबावाला झुगारुन ही वायु संरक्षण प्रणाली खरेदी करण्याकडे भारताने पाऊल टाकलं आहे. भारत आपलं हवाई क्षेत्र मजबूत करण्यासाठी मोठ्या क्षमतेची प्रणाली खरेदी करणार आहे.
चीनने काही दिवसांपूर्वीच रशियाकडून एस-400 वायु संरक्षण प्रणाली खरेदी केली आहे. अमेरिकेने या व्यवहारावर तीव्र आक्षेप घेत चीनवर सँक्शन घातले आहेत. चीनच्या अनेक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आला आहे.
अमेरिकेचा दबाव झुगारुन भारत रशियाकडून S-400 खरेदी करण्याच्या दिशेने
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Oct 2018 10:20 AM (IST)
भारताने रशियाकडून एस-400 वायु संरक्षण प्रणाली खरेदी करु नये, अशी अमेरिकेची मागणी आहे. रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. पण रशिया आणि भारत हे जुने मित्र आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -