आज संध्याकाळी 5 वाजता अहमदाबाद विमानतळावर नरेंद्र मोदींचे आगमन होईल. त्यानंतर मोदी थेट खानपूर इथल्या भाजप कार्यालयाला भेट देणार आहेत. प्रत्येक विजयानंतर मोदी या कार्यलयाला भेट देतात. देशातल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वात जुन्या कार्यालयांपैकी हे एक पक्ष कार्यालय आहे.
मोदींनी त्यांच्या राजकीय जीवनातला बराच काळ या कार्यालयात घालवला आहे. पक्षाचे महामंत्री म्हणून त्यांनी या कार्यालयात खूप काळ काम केले आहे. याच कार्यालयात मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचेही काम पाहिले होते. त्यामुळे मोदींना हे पक्ष कार्यालय खूप जवळचे आहे. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीतील विजयानंतर मोदी या कार्यालयाला भेट देतात.
व्हिडीओ पाहा
आज मोदी या कार्यालयात नवनिर्वाचित भाजप खासदारांना भेटणार आहेत. तसेच जवळच्या लोकांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर मोदी गांधीनगर येथे जाऊन आईची भेट घेणार आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने 353 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. एकट्या भाजपने 303 जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्रातही भाजप-शिवसेना युतीने 41 जागा जिंकल्या आहेत. 2014 सालच्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे मोदींनी बहुमत मिळवले होते. यंदा मोदींची त्सुनामी पाहायला मिळाली. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा बहुमत मिळवले आहे. या विजयानंतर मोदी पहिल्यांदाच गुजरातला जाणार आहेत.