श्रीनगर : नगरोटा चकमकीचा तपास करणार्या सुरक्षा यंत्रणांनी आणखी एक मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तानातून येणाऱ्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्यासाठी बोगद्याचा वापर केला असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. हे दहशतवादी पाकिस्तानच्या शकरगड येथून सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून घुसले. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि बारूद पूर्वीपासूनचं ट्रकमध्ये असल्याचा संशय आहे.
सीमेवर असलेल्या ताराच्या कुंपणाला कोणतीही छेडछाड झाली नसल्याचा दावा सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये बोगद्यातून दहशतवादी घुसल्याचा विश्वास आहे. बोगदा बनवून दहशतवाद्यांनी सीमा ओलांडल्याची ही पहिली घटना नाही.
जम्मूमध्ये ठार झालेल्या जैश दहशतवादी मोठी योजना आखत होते
गुरुवारी नगरोटाजवळ जम्मूमध्ये झालेल्या चकमकीत ठाक झालेल्या जैशच्या दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा होता. त्यांच्याकडून 11 एके 47 रायफल्स आणि पिस्तूलही जप्त करण्यात आल्याची माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. मोठा घातपात करण्याची योजना हे दहशतवादी आखत असल्याची शक्यता आहे. हे चौघे काश्मीरकडे जाणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते. टोल प्लाझाजवळ पोलिसांनी ट्रक थांबविला आणि त्यानंतर चकमकीत हे चौघे ठार झाले.
नगरोटा एन्काऊंटरनंतर पंतप्रधान मोदींकडून जवानांचे कौतुक, म्हणाले..
गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांना घेऊन जाणारा ट्रकला थांबवून ड्रायव्हरला विचारपूस केली असता त्यानं पळ काढायला सुरुवात केली. पोलिसांच्या पथकावर ट्रकच्या आतून गोळीबार झाला. मग प्रत्युत्तरात जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी ठार झाले. त्यांच्याकडून 11 एके-47 रायफल आणि 3 पिस्तूल यांच्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक दहशतवादी कमीतकमी 3 एके-47 रायफल घेऊन जात होता. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर यंदाची ही दुसरी चकमकी होती. यापूर्वी जानेवारीमध्ये सुरक्षा दलाने 3 दहशतवादी ठार मारले होते. तेही अशाचप्रकारे ट्रकच्या आत लपून जात होते.