Jaishankar On Pakistan : भारताचे परराष्ट्र मंत्री (Minister of External Affairs of India) एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा सूचक इशारा दिला आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा उल्लेख करत म्हटलं की, कोणताही देश आपल्या समस्यांमधून बाहेर पडून समृद्ध होऊ शकत नाही, जर त्याचा मूळ उद्योग दहशतवाद असेल. परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, ''भारत हा अत्यंत सहनशील देश आहे. आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेसाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार असलेला देश अशी भारताची प्रतिमा आहे.''


S Jaishankar On China : भारत-चीन व्यापारी संबंधावर परराष्ट्र मंत्र्यांचं वक्तव्य


भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत-चीन व्यापारी संबंधावर भाष्य केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चीनसोबत व्यापारी असंतुलनासाठी भारतीय कंपन्याही थेट जबाबदार आहेत. भारतीय कंपन्यांनी विविध स्रोतांचा विकास न केल्याचा ठपकाही त्यांनी ठेवला. एशिया इकोनॉमिक डायलॉग कार्यक्रमात भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं की, सरकार आत्मनिर्भर भारत मोहिमेवर अधिक भर देत आहे. मोठ्या प्रमाणावर परराष्ट्र कर्जामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते, असंही परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 


S Jaishankar On China : "चीनसोबत व्यापार करण्यासाठी भारतीय कंपन्याही जबाबदार"


व्यापारी असमतोलासाठी कंपन्याही थेट जबाबदार असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं आहे. चीनसोबच्या व्यापारी असमतोलाबद्दल परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अनेक गंभीर बाबींवर चर्चा केली. त्यांनी म्हटलं की, यासाठी फक्त भारत सरकार नाही तर भारतीय कंपन्याही जबाबदार आहेत. यासाठी कंपन्याही समान जबाबदार आहेत. भारतीय कंपन्यांनी सुटे भागांसह इतर विविध कच्चा मालासाठी स्त्रोत आणि मध्यस्थी मार्ग तयार केलेले नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्यासह अनेकांनी केंद्र सरकारला सेवा क्षेत्रावर भर देण्यास सांगितलं आहे.


काय म्हणाले एस जयशंकर?


जयशंकर यांनी सावध केले की जे उत्पादन कमी करतात ते भारताच्या धोरणात्मक भविष्याला हानी पोहोचवत आहेत. परराष्ट्र मंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा उल्लेख करत म्हटले की, कोणताही देश आपल्या समस्यांमधून बाहेर पडून समृद्ध होऊ शकत नाही, जर त्याचा मूळ उद्योग दहशतवाद असेल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


S. Jaishankar: संयुक्त राष्ट्र संघ अजूनही 1945 मध्येच वावरतोय, सदस्य देशांना न्याय देण्यास असमर्थ; जयशंकर यांनी व्यक्त केली नाराजी