Farmer Andolan Naxal Connection : गेल्या वर्षीच्या दिल्लीतील शेतकरी आंदोलनात (Farmers Protest) नक्षलवादी (Naxal) आणि माओवादी (Maoism) घुसल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या वेळीच्या शेतकरी आंदोलनात नक्षलवादी आणि माओवाद्यांचा सहभाग होता आणि त्यांनीच आंदोलनाचं नेतृत्तव केल्याचा भक्कम पुरावा समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षी दिल्लीत झालेल्या आंदोलनामध्ये नक्षलवादी आणि माओवादी शिरल्याचे गोपनीय रिपार्ट त्यावेळी इंटेलिजन्स एजन्सीसने दिले होते. मात्र, तेव्हा अनेकांनी त्याला इंटेलिजन्स एजन्सीसचा प्रोपौगंडा सांगत शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांचा आणि माओवाद्यांच्या शिरकाव झालेला नसल्याचा दावा केला होता. मात्र, आता खुद्द नक्षलवाद्यांनीच शेतकरी आंदोलनात त्यांची माणसे असल्याचा भक्कम पुरावा दिला आहे.


गेल्या वर्षीच्या किसान मोर्चात नक्षलींचा नेता


गेल्यावेळी झालेल्या शेतकरी आंदोलनात दर्शपाल सिंह हा किसान मोर्चाचा नेता सहभागी झाला होता. दर्शनपाल सिंह नक्षलवाद्यांचा आणि माओवाद्यांच्या केंद्रीय कार्यकारिणीत कार्यरत होता. मात्र, तो नक्षलवाद्यांच्या अपेक्षेप्रमाणे आंदोलनात तीव्रता आणू शकला नाही म्हणजे हिंसाचारा उफाळू शकला नाही. या आरोपात त्याला नक्षलवाद्यांच्या कार्यकरिणीतून बरखास्त करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीने जानेवारी महिन्यात खुद्द एक पत्रक काढून दर्शनपाल आणि इतर काही कॉम्रेडच्या हकालपट्टीची माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनात नक्षलवाद्यांचा फक्त शिरकाव नव्हता, तर त्यांचे कॉम्रेड या आंदोलनात नेतृत्व देऊन त्याला हिंसेकडे नेण्याचे प्रयत्न करत असल्याचे नक्षलवाद्यांच्या जानेवारी महिन्यात काढलेल्या पत्रकातून स्पष्ट झालं आहे.


नक्षलींच्या नेत्याकडून शेतकरी मोर्चाचं नेतृत्व


नक्षलवाद्यांनी हकालपट्टी केलेला दर्शनपाल गेल्या वेळीच्या शेतकरी आंदोलनात सगळ्यात पुढे होता. यावरूनच शेतकरी आंदोलनात किती नक्षलवादी आणि माओवादी सक्रिय असतील याची कल्पना करता येते. या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांच्या अँटी नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी माहिती दिली आहे.


नक्षलवादी आणि माओवाद्यांचं शेतकऱ्यांसोबत चांगलं नेटवर्क


संदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''दर्शनपाल सिंह क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष होते आणि कमिटी सदस्य होता, त्यानेच गेल्या वेळीच्या किसान मोर्चाच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं. पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश या भागात नक्षलवादी आणि माओवाद्यांचं शेतकऱ्यांसोबत चांगलं नेटवर्क आहे. याचा आधार घेत गेल्यावेळी शेतकरी आंदोलन मोठं करण्यात आलं होतं, जे यशस्वी झालं. आता समोर आलेल्या पत्रकात स्पष्ट झालं आहे की, भूमिगत क्रांतिकारी संघटनेच्या नेत्यांनी शेतकरी आंदोलनाचं नेतृत्व केलं होतं.''


आंदोलनात हिंसाचार करण्याचा माओवादी आणि नक्षलवाद्यांचा हेतू


शेतकरी आंदोलनात परिस्थिती चिघळावी आणि हिंसाचार व्हावा, असं माओवादी आणि नक्षलवाद्यांना अपेक्षित होतं. नक्सल ऑपरेशनचे स्पेशल आयजी संदीप पाटील यांनी सांगितली की, ''नक्षलवादी आणि माओवाद्यांची विचारधारेचा महत्त्वाचा भाग म्हणजे समाजात अशांतता पसरवणं, ज्यामुळे पोलिसांना सूत्रे हाती घ्यावी लागतील आणि परिस्थिती चिघळेल, तसेच तरुणांवर गुन्हे दाखल होतील. हिंसाचार घडला की, ज्या तरुणांवर गुन्हे दाखल होतात ते नक्षल आणि माओवादी संघटनेत सामील होतात.''


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bharat Bandh : शेतकऱ्यांकडून आज 'भारत बंद'ची हाक! काय बंद, काय सुरु?