MyHeritage App : MyHeritage App आणि त्याचे Deep Nostalgia feature हे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. आपल्या MyHeritage App च्या माध्यमातून आपल्या  जुन्या फोटोंच्या मदतीने यूजर्स अॅनिमेटेड व्हिडीओ तयार करताना दिसत आहेत. MyHeritage App च्या डीप नोस्टॅल्जिया फीचरच्या मदतीने तयार करण्यात आलेले हे व्हिडीओ पाहताना आपल्याला जुन्या काळात गेल्याचा भास निर्माण करुन देतंय. 


आर्टिफिशिअल इन्टेलिजन्सच्या मदतीन 'डिफफेक' चा वापर करुन अशा प्रकारचे व्हिडीओ तयार करण्यात येत आहेत. या फोटोंचा नवीन व्हिडीओ तयार करताना आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि भावना या जणू काही प्रत्यक्षातच आहेत असाच भास होतोय. हे पाहताना कदाचित आपला आपल्यावरच विश्वास बसत नाही. 


या अॅपच्या माध्यमातून अनेक यूजर्सनी जुन्या काही प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचे व्हिडीओ तयार केले आहेत. यामध्ये भगतसिंहांच्या हॅट घातलेल्या फोटोवरुन तयार करण्यात आलेला अॅनिमेटेड व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. भगतसिंहांच्या सोबतच स्वामी विवेकानंद, कस्तुरबा गांधी, लोकमान्य टिळक, अरविंद घोष, प्रेमचंद यांच्या फोटोवरुनही व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. 






कमाल आहेत WhatsApp चे हे तीन फिचर्स, तुम्ही पाहिले का?


काय आहे MyHeritage App?
MyHeritage App हे एक असं अॅप आहे जे आपण डीएनए आणि इतर काही दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्या कुटुंबाचा इतिहास, सद्य स्थिती आणि भविष्यकाळाची माहिती सांगू शकते. महत्वाचं म्हणजे आता या अॅपच्या माध्यमातून अनेकांना आपल्या हरवलेल्या भावंडांना शोधून काढलंय. या अॅपच्या माध्यमातून आपण आपल्या फॅमेली ट्री तयार करु शकतो.


फोटोच्या आधारे व्हिडीओ कसे तयार करायचं
या अॅपच्या Deep Nostalgia या फीचरच्या माध्यमातून आपण फोटोच्या माध्यमातून आपण अॅनिमेटेड व्हिडीओ तयार करु शकतो. त्यासाठी आपल्याला माय अॅपच्या वेबसाइटवर लॉग इन करावं लागेल. त्यासाठी आपला ई मेल अथवा फेसबुकच्या आयडीचा वापर करावा लागतोय. त्यानंतर आपल्याला ज्याचा व्हिडीओ तयार करायचा आहे त्याचा फोटो अपलोड करावा लागेल. त्यानंतर अवघ्या काही सेकंदमध्ये आपल्यासमोर त्याचा व्हिडीओ तयार होऊन येतोय. माय अॅप हे आपण आपल्या फोनमध्येही डाऊनलोड करु शकता. सुरुवातीला मोफत काही व्हिडीओ तयार करुन देण्यात आल्यानंतर आपल्याला शुल्क मोजावं लागतं.






'पतीदेव व्हॉट्सअॅपला माझा डीपी ठेवत नाहीत', पुणे पोलिसात महिलेची अजब तक्रार