Aadhar PVC Card : आधार कार्ड सर्वांसाठी किती महत्वाचं आहे हे सांगायची आवश्यकता नाही. आता आपलं आधार कार्ड आपल्याला एका नव्या रुपात पाहायला मिळणार आहे. जे की एखाद्या स्मार्टकार्ड सारखं दिसणार आहे. आधार निर्मिती संस्था UIDAI ने ट्वीट करत या बदलांबाबत माहिती दिली आहे.  आता आधार कार्ड ला PVC कार्ड वर रिप्रिंट केलं जाऊ शकतं. हे कार्ड आपल्या एटीएम अथवा डेबिट कार्ड सारखं आहे, जे आपल्या पाकिटात सहज मावू शकेल. यूआईडीएआईकडून एक ट्वीट करत म्हटलं आहे की, आता आपलं आधार सुविधपूर्ण साईजमध्ये असेल, ज्याला आपण सहज आपल्या पाकिटात ठेवू शकाल.


नवीन आधार मध्ये काय असेल खास


आधार पीव्हीसी कार्ड हे पूर्णपणे वॉटरप्रूफ असणार आहे. तसेच चांगलं प्रिंट आणि लॅमिनेटेड असणार आहे. हे दिसायला एटीएम किंवा स्मार्टकार्ड सारखं आहे. आपलं आधार पीव्हीसी आपण ऑनलाइन ऑर्डर करू शकतो. प्लास्टिक रुपात असलेलं हे नवं आधार कार्ड टिकाऊ देखील आहे. तसेच दिसायला आकर्षक आणि यात लेटेस्ट सेक्युरिटी फीचर्स आहेत.  सेक्युरिटी फीचर्स मध्ये होलोग्राम, गिलोच पॅटर्न, घोस्ट इमेज आणि मायक्रोटेक्स्ट असणार आहे. या कार्डसाठी आपल्याला 50 रुपयांचा खर्च येणार आहे.


कसं मिळवायचं नवं आधार पीव्हीसी कार्ड




  • नव्या आधार पीव्हीसी कार्डसाठी यूआयडीएआय वेबसाईटवर जावं

  • तिथं 'My Aadhaar' सेक्शनमध्ये जाऊन 'Order Aadhaar PVC Card' वर क्लिक करा

  • त्यानंतर आपला आधारचा 12 डिजिट नंबर किंवा 16 डिजिटचा व्हर्चुअल आयडी अथवा 28 डिजिटचा आधार एनरोलमेंट आयडी (EID) टाका

  • नंतर सेक्युरिटी कोड अथवा कैप्चा भरा

  • यानंतर ओटीपीसाठी ​Send OTP ऑप्शनवर क्लिक करा.

  • आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. तो ओटीपी टाकून सबमिट करा.

  • नंतर आपल्याला आपल्या आधार पीव्हीसी कार्डचा प्रीव्ह्यू येईल. ल

  • त्यांनंतर आपण खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करून 50 रुपयांचं पेमेंट करायचं आहे

  • पेमेंट पूर्ण केल्यानंतर आपल्या आधार पीव्हीसी कार्डची ऑर्डर प्रोसेस पूर्ण होईल.