Allahabad High Court : मुस्लिम समाजात बहुपत्नीत्व प्रथा असली तरी अलाहाबाद हायकोर्टाने एका प्रकरणात महत्त्वाचा निकाल दिला आहे. विशेष म्हणजे हायकोर्टाने इस्लाम धर्मग्रंथ कुराणचा दाखला देत एका मुस्लिम व्यक्तीने दुसरा विवाह करू नये, असं म्हटलं आहे. पहिली पत्नी असताना मुस्लिम व्यक्तीनं दुसरा विवाह करू नये, असं अलाहाबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.


'पहिली पत्नी असताना मुस्लिम व्यक्तीनं दुसरा विवाह करू नये'


अलाहबाद हायकोर्टाने म्हटलं आहे की, महिलांचा सन्मान करणारा देश सभ्य देश मानला जातो. मुस्लिम व्यक्तीने पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करु टाळायला हवं. पहिली पत्नी असताना तिच्या संमतीविरोधात जाऊन दुसरं लग्न करणं हा पहिल्या पत्नीवरील अन्याय आहे. इस्लाम धर्म पहिली पत्नी असताना दुसरं लग्न करण्याची परवानगी देतो. मात्र यामध्ये पहिल्या पत्नीच्या विरोधात जाऊन दुसरं लग्न करणे हा तिच्यावरील अन्याय आहे. पहिल्या पत्नीच्या मर्जीविरोधात दुसरं लग्न करण्याची परवागनी कुराण देत नाही, असं हायकोर्टानं म्हटलं आहे.


हायकोर्टाने पवित्र इस्लामिक धर्मग्रंथ कुराणचा हवाला म्हटलं आहे की,


मुस्लिम धर्मीय पुरुष जोपर्यंत पहिली पत्नी आणि तिच्या अपत्यांना सुखी ठेवत त्याचं पालनपोषण करून त्यांना न्याय देऊ शकत नाही, तोपर्यंत पुरुषाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने असं निरीक्षण नोंदवलं आहे की, जर मुस्लिम पुरुष त्याची पहिली पत्नी आणि मुलांचं पालनपोषण करण्यास सक्षम नसेल तर त्याला दुसरं लग्न करता येणार नाही. पवित्र ग्रंथ कुराणमधील सुरा 4 आयत 3 चा संदर्भ देत हायकोर्टानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. पहिली पत्नी आणि मुलांची जबाबदारी स्वीकारल्यानंतरच मुस्लिम पुरुषाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार आहे.


'...तरच मुस्लिम धर्मीय पुरुषाला दुसरं लग्न करण्याचा अधिकार'


कोर्टाने म्हटलं आहे की, मुस्लिम धर्मीय व्यक्तीला दुसरं लग्न करायचं असेल, तर त्यासाठी पहिल्या पत्नीची संमती असणं गरजेचं आहे. त्याशिवाय पुरुषाने पहिली पत्नी आणि अपत्यांच्या पालनपोषणासाठीही सक्षम असणं आवश्यक आहे. एखाद्या मुस्लिम समाजातील पुरुषाला दुसरं लग्न करायचं असेल तर, पहिली पत्नी आणि मुलांची जबाबदारी घेणं पुरुषासाठी आवश्यक आहे, असं अलाहबाद उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.


कोर्टाने कुराणचा हवाला देत हे निरीक्षण नोंदवलं आहे. अलाहबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात सुनावणी देताना म्हटलं आहे की, मुस्लिम धर्मीय पुरुषाला दुसरं लग्न करण्याची इच्छा असेल, तर त्यासाठी त्या व्यक्तीने त्याची पहिली पत्नी आणि तिच्या मुलांचं पालनपोषण करण्यासाठी सक्षम असायला हवं. तर तो पुरुष दुसरं लग्न करू शकतो. यासाठी पहिली पत्नी आणि तिच्या मुलांची जबाबदारी त्या पुरुषाने सांभाळणं गरजेचं आहे.