मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर सर्वात श्रीमंत शहर बनलं आहे. मुंबईमध्ये 46,000 कोट्यधीश तर 28 अब्जाधीश राहात असल्याचं नुकतंच एका अहवालातून समोर आलं आहे. मुंबईची एकूण मालमत्ता 820 अब्ज डॉलर इतकी आहे. अहवालातील आकडेवारी डिसेंबर 2016 मधील सर्व्हेक्षणातील आहे.
न्यू वर्ल्ड वेल्थच्या अहवालानुसार मुंबई देशातील सर्वात श्रीमंत शहर आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली, तर तिसऱ्या स्थानावर बंगळुरुचा क्रमांक लागतो. दिल्लीत कोट्यधीशांची संख्या 23,000 आहे, तर 18 अब्जाधीश आहेत. दिल्लीची एकूण मालमत्ता 450 अब्ज डॉलर आहे. बंगळुरुची एकूण मालमत्ता 320 अब्ज डॉलर आहे. बंगऴुरुत 7700 कोट्यधीश आणि 8 अब्जाधीश राहतात. 310 अब्ज डॉलर मालमत्तेसह हैदराबाद चौथ्या स्थानावर आहे. हैदराबादेत 9000 कोट्यधीश आणि 6 अब्जाधीश आहेत.
कोलकाता शहरात कोट्यधीशांची संख्या 9600 आहे, तर 4 अब्जाधीश आहेत. कोतकात्याची एकूण मालमत्ता 290 अब्ज डॉलर इतकी आहे. तर पुण्याची एकूण मालमत्ता 180 अब्ज डॉलर आहे. पुण्यात 4500 कोट्यधीश आणि 5 अब्जाधीश राहतात.
या यादीत चेन्नई, चंदीगढ, सूरत, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गोवा, जयपूर वडोदरा आदी शहरांचा समावेश आहे. देशाची एकूण मालमत्ता 6200 अब्ज डॉलर इतकी आहे. देशातील 2,64,000 कोट्यधीश, तर 95 अब्जाधीश आहेत.