- दिल्ली – 4.73
- हैदराबाद – 4.77
- बंगळुरु – 4.71
- कोलकाता – 4.51
- चेन्नई – 4.45
- डलास (अमेरिका) – 4.32
- हीथ्रो ( इंग्लंड) – 4.25
- पॅरिस – 3.91
- दुबई – 4.32
- लॉस एंजेलिस (अमेरिका) – 4.04
- फ्रँकफर्ट (जर्मनी) – 3.08
मुंबई, दिल्ली विमानतळं जगात सर्वाधिक सुरक्षित!
एबीपी माझा वेब टीम | 07 Mar 2017 06:41 PM (IST)
मुंबई : जगात दिल्ली आणि मुंबई विमानतळं सर्वाधिक सुरक्षित आहेत. लंडनमधील हीथ्रो विमानतळ, अमेरिकेतील लॉस एंजेलिस आणि पॅरिस विमानतळापेक्षा मुंबई आणि दिल्ली विमानतळं सर्वाधिक सुरक्षित आहेत. भारतातील विमानतळांना सुरक्षा पुरवणारी यंत्रणा सीआयसीएफने हे आकडे सादर केले आहेत. सीआयसीएफच्या सुरक्षेला सर्व्हेक्षणात सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत. काय आहे सर्व्हेक्षण? एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हिस म्हणजेच एक्यूएस संबंधित सर्वेक्षण जगभरातील विमानतळांवर करण्यात आलं आहे. बेल्जिअममधील एका कंपनीने हे सर्व्हेक्षण केलं. दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरु, कोलकाता आणि चेन्नई या विमानतळांनी हीथ्रो, पॅरिस, लॉस एंजेलिस, दुबई या विमानतळांनाही मागे सोडलं आहे. कोणत्या विमानतळाला किती गुण? सुरक्षेसोबतच इतर गोष्टींचाही या सर्व्हेक्षणात समावेश करण्यात आला आहे. विमानतळावरील कर्मचाऱ्यांची विनम्रता, सहकार्य, सुरक्षा तपासणीसाठी वेटिंग टाईम आणि एकूण सुरक्षा तपासणीचं निरीक्षण या सर्वेक्षणात करण्यात आलं. त्यामध्ये मुंबई विमानतळाने सर्वाधिक 4.83 गुणे मिळवले आहेत.