Nita Ambani Audi A9 Chameleon : भारताचे सर्वात श्रीमंत उद्योगपती म्हणून मुकेश अंबानी यांचे नाव नेहमीच सर्वांसमोर येते आणि रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना ओळख करून देण्याची गरजच नाही. त्या केवळ सामाजिक कार्यांसाठीच नव्हे, तर त्यांच्या आलिशान आणि लक्झरीयस जीवनशैलीसाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या गॅरेजमध्ये एकापेक्षा एक भन्नाट, महागड्या गाड्या आहेत. देशातील सर्वात महागडी कार त्यांच्या गॅरेजमध्ये आहे. पण कोणती कार आहे? आणि त्या कारचे भन्नाट फीचर्स काय आहे? तसेच कारची किंमत किती आहे? हे जाणून घेऊया....
अंबानी कुटुंबाच्या गॅरेजमध्ये महागड्या आणि आलिशान गाड्यांची रांग आहे. पण अशी एक कार आहे, जी केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात कमी आणि महागड्या कारांपैकी एक मानली जाते. नीता अंबानी यांच्याकडे Audi A9 Chameleon आहे, अशी कार जी केवळ एक बटण दाबताच रंग बदलते आणि तिच्या मालकिणी स्वतः नीता अंबानी आहेत. तब्बल ₹100 कोटी किंमतीची ही कार केवळ देखणेपणासाठीच नाही, तर तिच्या अनोख्या फीचर्ससाठी प्रसिद्ध आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑडीची ही कार तब्बल 600 हॉर्सपॉवरच्या तुफानी इंजिनसह बाजारात उपलब्ध आहे.
Audi A9 Chameleon ची खासियत
रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत तब्बल 100 कोटी रुपये आहे. या कारची खासियत म्हणजे, Audi A9 Chameleon ही कार फक्त एका बटणाच्या स्पर्शाने रंग बदलते. होय, यात वापरण्यात आलेल्या डायनॅमिक पेंट टेक्नॉलॉजीमुळे ही कार क्षणार्धात वेगवेगळ्या रंगांमध्ये बदलू शकते. हीच गोष्ट तिला इतर सर्व गाड्यांपासून वेगळी आणि खास बनवते. जगात अशा कार फारच मोजक्या लोकांकडे आहेत, म्हणजेच जगभरात आतापर्यंत अशा केवळ 11 गाड्या विकल्या गेल्या आहेत.
तगडे इंजिन आणि डिझाईन
Audi A9 Chameleon मध्ये 4.0 लिटरचा V8 इंजिन देण्यात आला आहे, जो तब्बल 600 एचपीची पॉवर जनरेट करतो. या कारला फक्त दोनच दरवाजे असून, तिची लांबी सुमारे 5 मीटर आहे. याशिवाय, या कारचे विंडशील्ड आणि रूफ एकत्र इंटिग्रेट करण्यात आले आहे, ज्यामुळे तिचा लुक अधिकच फ्युचरिस्टिक दिसतो. आणि हो, आलिशान इंटिरियर, हाय-टेक गॅजेट्स आणि काही खास फिचर्स हे या कारला खऱ्या अर्थाने ‘कलेक्टर आयटम’ बनवतात.
हे ही वाचा -
Car loan Information:
Calculate Car Loan EMI