नवी दिल्ली:  उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी रोजी स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती? त्या गाडीचा वापर कधी आणि कोणी केला या सर्वांत संदर्भात अजूनही वेगवेगळ्या चर्चा आहेत. अशात आता या स्कॉर्पिओबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.  आता या प्रकरणाचं कनेक्शन आता इंडियन मुजाहिद्दीनसोबत असल्याचं समोर आलं आहे. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी तहसीन अख्तरकडून दिल्लीच्या तिहार जेलमधून एक फोन जप्त केला आहे.  


टेलिग्राम चॅनलवरुन केली धमकीची पोस्ट


अशी माहिती मिळाली आहे की, तहसीनजवळ जो मोबाईल मिळाला आहे त्यात एक टेलिग्राम चॅनल अॅक्टिवेट केला होता.  टोर ब्राऊजरवरुन डार्क नेटवर व्हर्चुअल नंबर क्रिएट केला गेला होता. त्यावरुनच  एंटीलियाजवळ स्फोटकं आणि त्यानंतर धमकीबाबतची पोस्ट तयार केली होती. आता या प्रकरणी स्पेशल सेलकडून तहसीनची चौकशी केली जाणार आहे.  


Antilia Explosives Scare | मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकं असलेल्या स्कॉर्पिओ कारचं रहस्य कायम


सायबर एजेन्सीकडून मिळालं लोकेशन
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोलिसांना एका खाजगी सायबर एजेन्सीनं त्या फोनच्या लोकेशनबाबत माहिती दिली. ज्यावरुन टेलिग्राम चॅनल बनवलं होतं. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार 26 फेब्रुवारीला टेलिग्राम अॅपवर चॅनल सुरु केलं होतं.  


तिहारच्या जेल नंबर आठमध्ये बंद आहे तहसीन


स्पेशल सेलने तिहार जेलमध्ये सर्च ऑपरेशन केलं. त्यावेळी हा फोन जप्त करण्यात आला. इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवाही तहसीन अख्तर तिहारच्या जेल नंबर आठ मध्ये बंद आहे. तहसीन अख्तरवर बिहारची राजधानी पाटण्यातील गांधी मैदानामध्ये पंतप्रधान मोदींची रॅली,  हैदराबाद आणि बोधगयामधील बॉम्बस्फोटाचा आरोप आहे.


अंबानींच्या घरासमोर स्फोटकांसह मिळालेल्या 'त्या' स्कॉर्पिओबद्दल मोठी माहिती समोर


काय आहे स्कॉर्पिओच्या फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये 
स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर तपास करणाऱ्या फॉरेंसिक टीमच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या आहेत. या कारसोबत कुठल्याही प्रकारची छेडछाड तसेच नुकसान करण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं म्हटलं आहे. विशेष म्हणजे मनसुख हिरण यांची ही स्कॉर्पिओ कार 17 फेब्रुवारी रोजी इस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या सर्व्हिस रोडवरुन चोरी झाली होती. ज्याची तक्रार हिरण यांनी विक्रोळी पोलिसात केली होती.  फॉरेंसिक रिपोर्टनुसार, हायवेवरुन ज्यावेळी ही कार चोरी झाली त्यावेळी त्या कारचा दरवाजा खोलण्यासाठी किंवा चोरी करण्यासाठी कुठलीही छेडछाड, तोडफोड केलेली नाही. तसेच कुठलेही निशाण मिळालेले नाहीत. याचा अर्थ असा की कार चोरी करणाऱ्या व्यक्तिनं अगदी सहजपणे ही कार त्या ठिकाणाहून चोरी केली होती.