प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांची यादी, मंत्री गुलाबराव पाटलांचं नाव
एबीपी माझा वेब टीम | 25 Apr 2018 01:05 PM (IST)
देशभरातील प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे.
Analysis of MPs/MLAs with Declared Cases Related to Hate Speech
मुंबई: देशातील निवडणुकीबाबतचा अभ्यास करणारी संस्था, असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीएआरने नवा अहवाल प्रसिद्ध केला आहे. देशभरातील प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदार-खासदारांबाबतचा हा अहवाल आहे. प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांच्या यादीत भाजपचे 10 खासदार आणि 17 आमदार आहेत. यातील चार आमदार महाराष्ट्रातील आहेत. तर शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचंही नाव या यादीत आहे. देशातील सध्याच्या 58 आमदार, खासदारांनी प्रक्षोभक भाषणाप्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाला असल्याचं जाहीर केलं आहे. विद्यमान 15 खासदारांनी प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हे दाखल असल्याचं जाहीर केलं आहे. प्रक्षोभक भाषणाप्रकरणी विद्यमान खासदारांवर गुन्हे प्रक्षोभक भाषणाप्रकरणी भाजपच्या 10, तर AIUDF,TRS, PMK, AIMIM आणि SHS या पक्षांच्या प्रत्येक एक खासदारांवर गुन्हा दाखल आहे. विद्यमान 43 आमदारांवर गुन्हे देशभरातील विद्यमान 43 आमदारांनी आपल्यावर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा असल्याचं जाहीर केलं आहे. यामध्ये भाजप 17, टीआरएस आणि एमआयएमचे प्रत्येकी 5, टीडीपीचे 3, काँग्रेस, तृणमूल,, जेडीयू आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2, डीएमके, बसपा, सपा यांचे प्रत्येकी 1 आणि दोन अपक्ष आमदारांवर प्रक्षोभक भाषणाप्रकरणी गुन्हा दाखल आहे. राज्यनिहाय आमदार प्रक्षोभक भाषण करणाऱ्या आमदारांमध्ये महाराष्ट्रातील 4 आमदारांचा समावेश आहे. तर तेलंगणात सर्वाधिक 11, उत्तर प्रदेश 9, बिहार 4, आंध्र आणि कर्नाटक प्रत्येकी 3, उत्तराखंड आणि प. बंगाल प्रत्येकी 2, तर गुजरात, मध्य प्रदेश, तामीळनाडू, राजस्थान आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 1 आमदारावर प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल आहे. प्रक्षोभक भाषणप्रकरणी गुन्हा दाखल झालेल महाराष्ट्रातील आमदार