शस्त्र पुजेवेळी खंडवाच्या जिल्हाधिकाऱ्यांचा हवेत गोळीबार, व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 13 Oct 2016 10:17 AM (IST)
भोपाळ: दसऱ्याच्या मुहूर्तावर शस्त्र पुजेवेळी हवेत गोळीबार करणारी एक जिल्हाधिकारी वादात आली आहे. मध्य प्रदेशातल्या खंडव्याच्या जिल्हाधिकारी स्वाती मीना यांनी हा गोळीबार केला आहे. दसऱ्यानिमित्त खंडव्यात सर्वसाधारणपणे पोलीस निरीक्षक फायरिंग करतात. मात्र, स्वाती मीना यांनी केलेल्या फायरिंगचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. या व्हिडिओनंतर जिल्हाधिकाऱ्यांवर काही कारवाई केली जाणार का? याबाबत आता खंडवामध्ये चर्चा सुरु आहे.