चेन्नई: तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता गेल्या तीन आठवड्यांपासून चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी त्यांची रुग्णालयता जाऊन भेट घेतली.


तब्बल अर्धा तास जेटली आणि शाह जोडीनं अपोलोच्या डॉक्टरांकडे जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस केली. जयललिता यांची सगळी खाती आणि अधिकार त्यांचे विश्वासू आणि अर्थमंत्री ओ.पनीरसेल्वम यांना देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जयललिता यांच्या प्रकृतीबद्दल प्रचंड वावड्या उठल्या होत्या. मात्र, त्यांच्याच सूचनेनुसार पनीरसेल्वम यांना कामकाजाचे अधिकार देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.