MP Bride Filed Case Against Beautician : मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नामध्ये ब्युटीशियनने (Beautician) केलेला मेकअप (Make Up) आवडला नाही म्हणून एका नववधूने थेट पोलीस स्टेशनमध्येच तक्रार दाखल केली आहे. मध्य प्रदेशमध्ये ही वेगळी घटना समोर आली आहे. लग्नाच्या दिवशी सुंदर दिसण्यासाठी वधू ब्युटी पार्लरमध्ये खूप पैसे खर्च करतात. उत्तम मेकअप करण्यासाठी आणि चांगल्या लूकसाठी वेगवेगळे पर्याय निवडतात. पण लग्नाचाय छान मेकअप करुन सुंदर दिसण्याची इच्छा पूर्ण न झाल्याने या नवरीने थेट पोलिसांत धाव घेतली आहे.


मेकअप आवडला नाही म्हणून नववधूची थेट पोलिसांत धाव


मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एक नववधू लग्नाच्या दिवशी मेकअपसाठी एका ब्युटी पार्लरमध्ये गेली. यावेळी ब्युटिशयनने तिचा मेकअप चांगला केला नाही. नवरीचा मेकअप बिघडवणं या ब्युटिशियनला चांगलंच महागात पडलं. नवरीने मेकअप आवडला नसल्याची तक्रार ब्युटी पार्लरच्या मालकीणीकडे केली. पण ब्युटी पार्लरच्या मालकीणीने नवरीलाच शिवीगाळ केली. यानंतर नववधूने थेट पोलिसांतच धाव घेत ब्युटी पार्लरच्या मालकीणी विरोधातच तक्रार दाखल केली आहे.


नववधूकडून ब्युटी पार्लरचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल


या प्रकरणात नववधूने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये ब्युटी पार्लरचालक महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी अनिल गुप्ता यांनी सांगितलं की, 3 डिसेंबर रोजी एका तरुणीचं लग्न होतं. वधूच्या मेकअपसाठी मोनिका मेकअप स्टुडिओच्या मालक असलेल्या मोनिका पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नवरीच्या मेकअपसाठी साडेतीन हजार रुपयांचं मानधन ठरवलं. सर्व काही ठरलं.


पार्लर चालकाकडून नववधूला जातिवाचक शिवीगाळ


यानंतर लग्नाच्या दिवशी पार्लरमधील ब्युटीशियनने नवरीचा केलेला मेकअप नवरीला पसंत पडला नाही. याची तक्रार नववधूने ब्युटी पार्लर चालक महिलेकडे केली. पण पार्लरच्या मालकीणीने उलट वधूलाच जातिवाचक शिवीगाळ केली. या घटनेनंतर नववधूने ब्युटी पार्लर चालक महिलेविरोधात कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली.


ही नववधू सेन समाजातील आहे. या घटनेची माहिती मिळताच सेन समाजातील वेलफेअर असोसिएशनने नववधूसोबत पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितलं आहे की, पोलिसांनी सेन वेलफेअर असोसिएशन आणि नववधूच्या तक्रारीवरून ब्युटी पार्लर चालकाविरोधात त्कार दाखल केली आहे. सेन समाजाकडून करण्यात आलेल्या या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली आहे.